छावा
छावा
होते ते चतुर
शेर शिवा !
शेर चिरंजीवी
शँभू राजे,
ठरले छावा !!
रपारप
शत्रू कापती,
ते वीर छावा !
सिंहाचा जबडा !!
ही फाडती
मुघली रक्ताचा
पडे सडा !!
राजे स्वराज्यासाठी
गेले शेर शिवा !!
म्हणुन जन्मला
शूर छावा ,!!
वीर शँभू
मर्दानी छावा!!
विसरले तुम्ही
गनिमी कावा!!
संगमेश्वरी
झाली गद्दारी !!
औरंगजेबाने मारली
बाजी !!
होती गरज
भूमिगत होण्याची !!
खैर नव्हती
औरंगजेबाची!!
क्रुर औरंग !
धिप्पाड छावास,
केले निर्दयी
व्यंग !!
औरंगा नव्हता
दम म्हणून वापरला
कपटी डाव !
शेवटी आपल्यानीच
दिले छावास घाव !!
नकोच तो सत्येचा
हव्यास !
घेऊया आदर्श छत्रपती
शिवराय व शंभू राजेंचा !!
घडवूया पुन्हां इतिहास
हिंदवी स्वराज्याचा !!2!!
कवी -महेश ब्राह्मणकार, नाशिक.
