चेंडुफळीं
चेंडुफळीं


!!चेंडुफळीं!!
खेळ हा मनोमिलनांचा
एकतेचा !
नको तो दुरावा,
खेळातील यश अपयशाचा !!
कोण हरणार
कोण जिंकणार !!
यापेक्षा कोण
मन जिंकणार,
तो खरा विजेता !!
खेळ हा
अनिश्चिततेचा !
खेळाडूच्या अचुक
अंदाजाचा !!
म्हणुन वेळ
येते प्रत्येकाची !!
अचूकतेने करा
प्रतीक्षा विजयाची !!
लावा कसोटी
कौशल्याची !!
जिंकणार कधी,
हृदय तर कधी मैदान !
दोघांना सम सन्मान !!!
संयमाचा महामेरू !
चेंडूफळी खेळू !!
हार जित हा खेळ मैदानाचा !
ठेवा आदर्श खेळाडू वृत्तीचा !!
नका दुःखऊ कुणाला
हा खेळ संघ भावनेचा,
हा खेळ ,. मनोमिलनांचा, एकतेचा!!2!!
कवी- महेश ब्राम्हणकार, नाशिक