बाळ
बाळ

1 min

358
खुळ खुळ वाळा
निरागस बाळा !!
गुदु गुदु हसु
खुदु खुदु रडु,!!
पाण्याचा गडु
छान तुझा !!
गोड गोड 'पापा
खुळ खुळ खुळा
गोंडस बाळा!
चांदीच्या वाळा
छान तुझ्या!!
गोबऱ्या गालावर
पडते खळी !
सोन्याच्या हाती
चांदीची थाळी !!
गुदु गुदु
हसतोय
सोनु माझा!!
नटखट कान्हा
दिसतोय तान्हा !!
कवी महेश ब्राम्हणकार, नाशिक