!!फार्मा थरार!!
!!फार्मा थरार!!
!!फार्मा थरार!!
फार्मा थरार
चेंडूफळीचा!!
खेळ हा
मनोमिलनांचा!!
मैदानावर मावळ्यांचा
रंगीबेरंगी वेश!
खेळातून एकता
हाच एक संदेश!
फार्मा टूर्नामेंटची
चर्चा आज
देशा विदेशात!!
नाही अमुचा
खेळ गणिमी काव्यांचा!
निधड्या छातीवरती
झेल घेणार,
हा खेळ धैर्याचा!!
घेऊया प्रत्येक
धाव यशाची!
संयमाने करूया
आताशबाजी
चौकार षटकारांची!!
अमर्यादित यशाचे
मारणार आम्ही
चौकार आणि षटकार!
टाचणी पडली तरी
आवाज येणार ही फार्मा
संघटनेची पुकार!!
नकोच संकुचित
हेल्मेट ते!
आम्ही एकमेकांच्या
मनाचे होणार विजेते!!
करूया अहंकाराला
बाद!
घेऊया प्रेमाची दुहेरी धाव,
देऊनी एकमेकांना
साथ!!
करूया एकमेकांचे
स्वप्न साकार,दाखवूया
संघभावना!
फार्मा संघटनेचा सदैव
व्हावा विजय, हिच
आमची शिवगर्जना!!2!!
कवी - महेश ब्राम्हणकार
