पसंत नाहि
पसंत नाहि
इतरांना जमत असेल पण
मला मागे वळणे पसंत नाहि
असतो मग्न स्वत:मधी मी
क्षणाचीहि मला उसंत नाहि
बोलणारे बोलतीलच लोक
मला कसलीहि खंत नाहि
कवितांना माझ्या अवेळी असे
स्मशानात जळणे पसंत नाहि
द्यायला तिलांजली ईच्छांना
मी कुठलाहि साधुसंत नाहि
जिवनाच्या नौकावरील प्रवासी
मी प्रवासाला या कधी अंत नाही
वेगळी असावी ओळख माझी कारण
गर्दीच्या रंगात मळणे मला पसंत नाहि
मोठ्याल्या एखाद्या महलातला
राहणारा मी कुणी धनवंत नाहि
पानझड होणारच झाडावरची त्याची
त्या शिशिराला कसलिहि खंत नाहि
मी एक लुकलुकणारा तारा आकाशातला बरा आहे
बनुनी भ्रमर उगं फुलांना छळणे मला पसंत नाहि !!!