जग माझे निराळेच होते
जग माझे निराळेच होते
न बरसला कधीही थेंब पावसाचा
जे आले ते फक्त कोरडे वारेच होते
कुठे बरे दडला रे तो चंद्र का आज
आकाशात लुकलुकणारे तारेच होते
गोड असेल म्हणुन चाखले पण
थालीतले पदार्थ सारे खारेच होते
भेदभाव केला माणसांनी तितका
अरे देवाला तर सारे प्यारेच होते
शोधले चोहिकडे मग कळले की
मुठ्ठीत माझ्या काही सितारेच होते
विकासाच्या नावावर पोकळ घोषणा
खोटे वादे ,जयजयकाराचे नारेच होते
रोजचीच बात आहे विनाकारण होते
बाचाबाची "अरे" ला "का रे"च होते
जरी राहिले ईतके वर्षे दुनियेत या
पण जग माझे एक निराळेचे होते
काल मला वेडे म्हणायचे आज
तर रांगेत माझ्या ते सारेच होते