STORYMIRROR

Pramod Bawiskar

Action

3  

Pramod Bawiskar

Action

सलाम

सलाम

1 min
27.1K


वेगवेगळ्या रंगाचे 

झेंडे पाहून....

विटलो होतो रंगांना..

एक दिवस निश्चय केला

घरा घरा वर असलेले

हिरव्या ,पिवळ्या, निळ्या आणि भगव्या

रंगाचे झेंडे काढून फेकले.

आणि........

विविधतेतून एकता दाखवणाऱ्या

फक्त त्या तिरंग्याला सलाम केला....

रंग बदलणाऱ्या 

माणसांना पाहून..

पारखा झालो होतो

माणुसकीला

फेटाळले अशा माणसांना 

आणि .....

खरी माणुसकी दाखवणाऱ्या

फक्त त्या बाबा आमटेंना सलाम केला..

चमकेशगिरी करण्यासाठी

स्वच्छतेचे गोडवे गाणाऱ्या

आंधळ्या भक्तांना लाथाडले

आणि...

स्वच्छतेची खरी शिकवण देणाऱ्या

फक्त त्या गाडगेबाबांना सलाम केला.

आपल्याच आया-बहिणींच्या

अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या

नराधमांना फासावर लटकावले

आणि..

पर स्त्री माते समान मानणाऱ्या

फक्त त्या शिवरायांना सलाम केला.

भोळ्या जनतेला अंधश्रद्धेच्या

 खाईत लोटणाऱ्यां भोंदूच्या

कानशिलात लगावली...

आणि ..

अंधश्रद्धा दूर करू पाहणाऱ्या

फक्त त्या दाभोळकरांना सलाम केला.

मनुस्मृतीच्या वापर करून

बहुजनांना हीन लेखणाऱ्यां मनुवाद्यांना 

मी लेखणीने फटकारले 

आणि...

समानतेची शिकवण देणाऱ्या

फक्त बाबासाहेबांना मी सलाम केला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action