भेट
भेट
1 min
532
भेटली ना जरी भासवावे जरा
भाव नजरेतले साठवावे जरा
नाव वाऱ्यासवे डोलतांना सख्या
साजणा तू मला सावरावे जरा
आठवांचा सडा सांडला अंगणी
वेचतांना दिवे पेटवावे जरा
देह सरणावरी ठेवला तो कसा
श्वास फुंकूनिया जागवावे जरा
नित्य ते रुसणे जाणतो कारणे
साजणाच्या मना ओळखावे जरा
एकटे एकटे वाटले जर तुला
भेटणे आपले आठवावे जरा
