STORYMIRROR

Pramod Bawiskar

Others

1  

Pramod Bawiskar

Others

गोल आहे...

गोल आहे...

1 min
2.8K



गालगागा गालगागा

( मंजुघोषा )


अंतरीचे बोल आहे

राजकारण गोल आहे ।।१।।


लोकशाही साहण्याचा

नागरिकां टोल आहे ।।२।


बांधताना कोसळावे

यांत काही झोल आहे ।।३।।


पोसतो साऱ्या जगाला

जीवनाशी फोल आहे ।।४।।


कोण गेले झाड फाशी

 जीव हा अनमोल आहे ।।५।।


साधु संतांच्या जगाती

शांतता समतोल आहे ।।६।।


घरधनी ह्या घराचे

आपलेही मोल आहे ।।७।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन