Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Pramod Bawiskar

Classics Tragedy


3  

Pramod Bawiskar

Classics Tragedy


माह्या बाप

माह्या बाप

3 mins 6.9K 3 mins 6.9K

बाप माह्या बाप

कसा नारळावाणी भासे

वरून टणक

आतून गोड खोबरं जसे।।1।।

बाप माह्या बाप

कसा फणसावानी भासे

वरून काटेरी

आतून मऊशार गरे जसे ।।2।।

बाप माह्या बाप 

कसा इठ्ठलच भासे

माय माही रखमाई

त्याच्या बाजूला उभी दिसे ।।3।।

बाप माह्या बाप

कसा मेणासारखा मऊ

कठीण समय येता

होई वज्रासारखा रे भाऊ।।4।।

बाप माह्या बाप

कसा वडासारखा ताठ

किती वाढल्या फांद्या

परी मातीची नाही सोडली वाट ।।5।।

बाप माह्या बाप

जसा देवळातला देव

माह्या पाठीशी असतांना

मला कुणाचे नाही भेव ।।6।।

बाप माह्या बाप

जसा साधा भोळा सांब

संस्काराचे देणे देऊनी

राहीला व्यसनापासून लांब।।7।।

बाप माह्या बाप

जसा कोंदणातला हिरा

कुणी कितीही हिणवा

राग नाही कुणाचा कधी केला।।8।।

बाप माह्या बाप

नुसत्या नजरेचा धाक

यशस्वी होतांना त्याची

मिळे कौतुकाची थाप ।।9।।

असा बाप माह्या बाप 

जवा मले सोडून गेला

तवा मले कळलं

पोरांना बापच का हवा ? ।।10।।


Rate this content
Log in

More marathi poem from Pramod Bawiskar

Similar marathi poem from Classics