STORYMIRROR

Pramod Bawiskar

Others

4  

Pramod Bawiskar

Others

विरह

विरह

1 min
28.2K


गंधाळल्या क्षणांना माळून पाहतो मी

भेगाळल्या मनाशी चाळून पाहतो मी।।


आता नकोच वाटे शेजार चांदण्यांचा

साऱ्याच आठवांना टाळून पाहतो मी ।।


बेभान या मनाला आवरु कसा कळेना

विरहात आसवांना गाळून पाहतो मी ।।


समजावतो मनाला गुंतू नकोस आता

अश्रूत आठवांना क्षाळून पाहतो मी।।


नयनामधील चित्रे अन् भावना मनीच्या

रेखाटने नकोशी जाळून पाहतो मी ।।


सांगायला सखीला गुज माझिया मनाचे

शब्दास साखरेच्या भाळून पाहतो मी।।


बघतो प्रमोद स्वप्ने,राणी तुझी जपाया

वचनास गोड सा-या पाळून पाहतो मी ।।


Rate this content
Log in