Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pramod Bawiskar

Others

2.1  

Pramod Bawiskar

Others

आठवणीतील शाळा

आठवणीतील शाळा

1 min
15.1K


नभांगणी दिसतो हा चंद्र नी तारा

स्नेह मिलनाचा हा सोहळा दिसतो किती साजरा ।।


आपुलकीचा फुलू द्या असाच हा झरा 

फुलतांना उडू द्या अंगणी हा सुगंधी फवारा ।।


आपल्या शाळेप्रती प्रीत अशीच वाढू द्यावी

म्हणुनी ऐकावा आपुल्या मनाचा इशारा ।।


गुणगान गात रहावे शाळेचेच सदा

तोच बालपणीच्या आठवणींचा सहारा ।।


नको बहाणे नोकरीचे नी संसाराचे

मनाच्या कोपऱ्यात असू द्या थोडा निवारा ।।


संपला दुरावा आता आपल्यातला

जगास दिसू द्या आता हा खुशीचा नजारा ।।


अभ्यास न करण्याचा सांगायचा रोज नवा बहाणा

आठवणीत असू द्या तेंव्हाचा शिक्षकांचा मार जरा ।।


आता गेला तो जमाना ,राहिल्या त्या आठवणी

बालपणीच्या आठवणींपाशी तू रेंगाळ जरा।।


जगातल्या कुठल्याही मऊशार खुर्ची पेक्षा

गड्या ! आपला शाळेतला लाकडी बाक बरा ।।


 


Rate this content
Log in