श्रीकृष्ण जन्म-पाळणा
श्रीकृष्ण जन्म-पाळणा


गोकुळाष्टमी जन्म तो झाला
बाळ श्रीकृष्ण जन्माला आला
देवकी पुत्र आला वंशाला
वासुदेवाला आनंद झाला जो बाळा जो जो रे जो।।१।।
बाळ श्रीकृष्ण वाढू लागला
पाळणा त्याचा हलू लागला
गोकुळनगरी आनंद झाला
सारे गोपी होऊन गोळा जो बाळा जो जो रे जो।।२।।
कंस मामाला प्रश्न तो पडला
मारण्याची भीती त्याच्या जीवाला
सारासार त्याने विचार केला
जीवे मारू आता बाळाला जो बाळा जो जो रे जो।।३।।
वासुदेवाने विचार केला
बाळ श्रीकृष्ण दिला येशोदेला
बाळाचा प्राण
त्यांनी वाचवला
कंसाचा काळ वाढू लागला जो बाळा जो जो रे जो।।४।।
मित्रांबरोबर खेळू लागला
लंगड्या, पेंद्या, सुदामा जोडीला
राखितो गायी यमुने काठाला
असा हा बाळ नटखट झाला जो बाळा जो जो रे जो।।५।।
एक, एक गवळणीची अडवून वाट
जातो हट्टाने त्यांच्या पाठोपाठ
हळूच फोडतो त्यांचा हो माठ
दह्यासाठी धरूनी हट्ट जो बाळा जो जो रे जो ।।६।।
कंस मामाने केला हो छळ
भयभीत झाले अवघे भूमंडळ
तोच बाळ तो ठरला काळ
कंस मामाचा केला संहार ,जो बाळा जो जो रे जो।। ७।।