STORYMIRROR

Satish Wadekar

Classics Inspirational

1.1  

Satish Wadekar

Classics Inspirational

लोकमान्य टिळकांचा पोवाडा

लोकमान्य टिळकांचा पोवाडा

1 min
33.4K


नमन हो स्वातंत्र्य देवीला

भारत मातेला

पुण्य भूमीला

तिजसाठी प्राण ज्याने दिला

तिजसाठी प्राण ज्याने दिला

देह झिजविला

लढा उभारीला

वंदू त्या टिळकचरणाला .........।।१।।



आंग्लप्रभुत्वाचा होता काळ

जनतेसाठी काळ

जुलूमाला सुकाळ

अश्या वेळी जन्मला हा बाळ

अश्या वेळी जन्मला हा बाळ

देशभक्तीशी नाळ

स्वातंत्र्याची सकाळ

स्मरणात राहील त्रिकाळ ...........।।२।।



इंग्रजांचे दुष्ट सरकार

भयंकर क्रूर

टिळक सिद्धकर

आणिले डोके ठिकाणावर

आणिले डोके ठिकाणावर

बंधू चाफेकर

तात्या सावरकर

घडविले असे धुरंधर ............।।३।।



असंतोषाची केली हो चाल

संघटनाची ढाल

पाहुनी जनकौल

उत्सवांचा वाजविला ढोल

उत्सवांचा वाजविला ढोल

कार्य बहुमोल

इंग्रजांचे हाल

केसरीचे निनादले बोल ...........।।४।।



इंग्रजांनी बांधियला चंग

दाविला तुरुंग

तेथेही उत्तुंग

कर्मयोगाचा घडवी शृंग

कर्मयोगाचा घडवी शृंग

ग्रंथिले अथांग

वेदांग, पंचांग

गुणकीर्तनी होतो मी दंग ..........।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics