वृक्षवल्ली..
वृक्षवल्ली..
वृक्ष जीवापाड जपा
वृक्ष असती मित्र...
जीवांचा विसावा, पाखरांचा खोपा
तेची नयनरम्य चित्र...
वृक्ष देती गार सावली
गोड फळे-फुले देती...
प्राणवायू तो जगाया
फुकटात आपणांस देती..
दैनंदिन या जीवनी
वृक्ष बहु उपयोगी पडे..
शुद्ध हवा पुरवूनी
उभारे निरोगी कडे..
सृष्टी फुलूनिया जाते
रानावना शोभा येई...
घनदाट वनराई असता
नित्य पर्जन्यवृष्टी होई..
नष्ट होता वनराई
कोप निसर्गाचा होतो..
झाडांअभावी मग फेरा
भीषण दुष्काळाचा पडतो..
"वृक्षवल्ली आम्हां सोयरी"
तुकोबाराय सांगून गेलेत..
लावूनी प्रत्येकी एक झाड
करू या तयांचे संगोपन...
झाडे लावू शेतात
लावू घराच्या अंगणी..
लावू सडकेच्या काठी
अन् शाळेच्या प्रांगणी...