STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

थांब..मी हे जग सोडणार आहे..

थांब..मी हे जग सोडणार आहे..

1 min
2

कधीच जगलो नाही असं 
आयुष्य मी सध्या जगत आहे..
जिवंत प्रेत बनून फक्त तुझ्या 
विरहात रात्रंदिवस जळत आहे..

न भेटलेल्या  प्रेमासाठी 
मी पुरता होरपळत आहे..
स्वतः चे मन बाजूला ठेवून 
तुझी वाट पाहत जगत आहे..

स्वतःला, स्वतःच्या अस्तित्वाला 
मी हळूहळू विसरत आहे..
कितीही रडलो, कासावीस झालो 
तरी मी तुझ्यासाठी परकाच आहे..

खूप चुका केल्या असतील, हात 
जोडून नेहमी माफी मागत आहे..
माझे सर्व खोटे आणि तु फक्त 
तुझ्या भावनांना महत्व देत आहे..

तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी मी 
लायक नाही हे कळले आहे..
माझ्या नालायकीचा, अशुद्धतेचा 
जाब मी स्वामींनाच विचारणार आहे..

तुझे जग, तुझे माणसे व खोट्या 
जवळीकतेला तुजजवळ वेळ आहे..
तुझ्या नामाचा जप करता करताच 
थांब..मी हे जग सोडणार आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy