STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

मी नसेल जगात तेव्हा...

मी नसेल जगात तेव्हा...

1 min
7

मी नसेल जगात तेव्हा 
नसेल माझी चाहूल...
आठवणींच्या गर्दीमध्ये
आठवेल का माझी भूल?

तुझ्या एका हास्यासाठी
किती स्वप्ने रंगवली होती...
तुझ्या सुखाच्या प्रार्थनेसाठी
रात्रंदिवस जागवली होती...

तू अबोला धरलास जेव्हा
मी अश्रूंनी साद घातली...
तू दूर दूर जात राहिलीस
मी मात्र वाट तुझी पाहिली...

नसेल माझा रोजचा संदेश
नसेल भेटण्याचा हट्ट...
तरी एखाद्या निवांत क्षणी
आठवेल का माझे प्रेम घट्ट?

तुझ्या वाटेवर फुले असोत
तुझ्या ओठांवर हास्य राहो...
माझ्या वाट्याला विरह आला
तरी तुझा संसार सुखी राहो...

कधी पावसाच्या सरींत
कधी चांदण्यांच्या रात्रीत...
माझ्या प्रेमाची आठवण येईल
का तुझ्या एकांताच्या क्षणांत?

मी नसेन जगात तेव्हा
माझी कविता वाचशील का?
प्रेमासाठी झुरलेल्या मनाची
कधी तरी जाणीव ठेवशील का?

मी नसेल जगात तेव्हा 
मी नसेन तुझ्या आयुष्यात जेव्हा...
कळेल तुला कदाचित प्रिये,
कुणीतरी जीवापाड प्रेम केले होते तेव्हा...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy