STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

तु आणि तुझी आठवण.

तु आणि तुझी आठवण.

1 min
2

तू आणि तुझी आठवण,
त्यात गुंतलंय माझं मन,
शांत रात्री जागवणारी
जणू हळवी एकच स्पंदन.

तुटता तुटेना बेडी ही,
तुझ्या नावाची बांधलेली,
डोळ्यांत दाटे धूसर स्वप्नं
पाऊस होऊन सांडलेली.

जिथे भेटलो होतो कधीतरी,
तिथे आता शांतता उभी,
तुझ्या नावाने दाटणारी
धुक्यासारखी रिकामी छबी.

पहाट उजाडते, पण
उजाडलेलं मन उजाडत नाही,
रात्री एवढ्या रडवतात तरीही
मनातून मात्र जात नाही

प्रत्येक क्षणात तुझंच अस्तित्व,
श्वासागणिक जाणवतं,
दूर असूनही जवळच कुठेतरी
तुझं हसणं मनात दाटतं.

विसरावे म्हणता म्हणता
पुन्‍हा आठवणींचा वर्षावच झाला,
तू नसतानाही आयुष्य माझं
तुझ्याच भोवती लागतं फिरायला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy