STORYMIRROR

Chandan Pawar

Romance

4  

Chandan Pawar

Romance

नशिले डोळे..

नशिले डोळे..

1 min
2


तुझे ते नशिले डोळे,
जणू मदहोश करणारे प्याले...
एकदा नजर भिडली तुझ्याशी,
भान हरपून गेले सारे...

काजळाच्या काळ्या रेषेत,
सौंदर्य तुझे खुलून दिसते...
पापण्यांच्या मंद हालचालीत,
हृदयाची धडधड वाढते...

तुझ्या डोळ्यांत अशी जादू,
शब्दांनाही बोलता येत नाही...
नजर तुझी जेव्हा बोलते,
मनाला काही सुचत नाही...

कधी खट्याळ, कधी लाजरे,
कधी प्रेमाने ओथंबलेले...
तुझ्या नजरेच्या प्रत्येक कटाक्षात,
असतात भाव हजार दडलेले...

चंद्रालाही लाजवतील असे,
तुझ्या नयनांचे रूप निराळे...
त्यांच्या अथांग डोहामध्ये,
माझे स्वप्न हरवून गेले...

तुझ्या नजरेची नशा अशी,
की उतरता उतरत नाही...
डोळे मिटले तरी प्रिये,
तुझ्याशिवाय काही दिसत नाही...! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance