STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

व्यथा..

व्यथा..

1 min
7



खूप प्रेम केले तुझ्यावर
स्वतःलाही विसरून गेलो...
तुझ्या सुखासाठी प्रिये
माझे सारे दुःख पिऊन गेलो...

अश्रूंच्या साक्षीने कितीदा
तुला साद घातली पुरती ...
तुझ्या अबोल ओठांपुढती
हात जोडून उभी राहिली प्रीती...

किती विनवण्या करू तुला
किती आर्जवे करू सांग...
तुझ्या एका शब्दासाठी
मन झाले व्याकूळ अभंग...

तुझा अबोला जीवघेणा
तुझा दुरावा असह्य झाला...
जिवंतपणी विरहाचा दाह
माझ्या काळजाला जाळून गेला...

शेवटी जातो स्वामीचरणी
घेऊन दुःखांचा हा जीवघेणा थाट ...
स्वामी, कुणाला सांगू व्यथा
कुणापुढे मांडू मनाची आर्त हाक...

जिच्यासाठी जगणे होते
तिनेच मला दूर लोटले..
प्रेमाच्या या याचकाला
कुणीच समजून नाही घेतले 

स्वामी, आता धीर द्या
या व्याकूळ मनाला आधार..
तिच्या आठवणींच्या वादळातून
मला मरण देऊन करा निराधार ...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy