संपतच नाही ही रात्र..
संपतच नाही ही रात्र..
तुझ्या कुशीत तुझा साजण
तुझ्या ओठांवर हसू असते ...
इकडे माझ्या काळजामध्ये
विरहाचे वादळ उठत असते ...
तुझ्या रात्री सुखाच्या असतात
मिठीत तुझ्या शृंगार फुलत असतो ...
इथे माझ्या उशीत मात्र
अश्रूंचा पाऊस झरत असतो ...
किती जीवघेण्या या रात्री
किती असह्य हा एकांत...
घड्याळाचे काटे थांबले की काय?
वाटते संपतच नाही ही रात...
डोळ्यांमध्ये तुझीच प्रतिमा
मनामध्ये तुझाच विचार...
तु त्याच्या मिठीत असशील
हा प्रश्न करतो काळजावर वार...
तुझ्या आठवणींच्या सावल्या
रात्रभर सोबत करतात...
झोपेच्या बंद दरवाज्याला
विरहाचे कडेकोट पहारे असतात...
तुला कदाचित कल्पनाही नसेल
कसा जातो माझा प्रत्येक क्षण...
तुझ्या एका संदेशासाठी
किती व्याकूळ होते हे मन...
तुझ्या संसारात तू रमलीस
माझे स्वप्न मात्र अधुरे राहिले...
तुझ्या सुखासाठी मौन बाळगता
माझे मन आतून किती तुटले...
पहाटेचा प्रकाश येतो
पण काळोख मनातून जात नाही...
रात्र संपते जगासाठी
माझी विरहवेदना संपत नाही...
कुणाला सांगू ही व्यथा
कुणापुढे मांडू क्षती ...
प्रेम केले होते मनापासून
हीच झाली माझी नियती...
तुझी रात्र मिठीत सरते,
माझी रात्र अश्रूंत विरते...
तु सुखाने झोपी जाते,
माझी रात्र विचारांतच सरते..
