STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

सल

सल

1 min
3

तुझी आठवण येते जीवघेणी
ती तुलाही येते का?

तुझे शब्द पडतात कानी
ते तुला ही ऐकू येतात का?

तू दाखवलेली स्वप्ने मला
कधी तुला पडतात का?

तू दिलेल्या जखमा मनाला
तुलाही सलतात का?

तू दिलेल्या वेदना हृदयाला
तुलाही कधी होतात का?

विरहाच्या अग्नीत जळतो मी
त्या तुलाही जाळतात का?

तू दिलेले अविरत अश्रू 
तुझ्या डोळ्यात येतात का?

तू दुर्लक्षलेलं मन माझे
हे तुझ्या लक्षात येते का?

छळतो तुझा भास मला
तुलाही आभास होतात का?

शेवटी एवढंच म्हणेन मी
मी जे अनुभवलं तुझ्याकडून
ते तू ही कधी अनुभवशील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy