हिंदोळा..
हिंदोळा..
सखे कधीच मी कोणावर
कविता लिहत नाही..!
तुझी आठवण झाल्यावर मात्र
लिहल्याशिवाय जमत नाही..!!
तू दूर गेल्यावर तुझ्यासारखी
जीव लावणारी भेटणार नाही..!
मग माझ्याही आसवांची सरिता
तुझ्यासाठी आटणार नाही..!!
अश्रूंची चेष्टा होते तेव्हा
हुंदक्यांचे सरण होतं..!
जिद्द मनापासून संपते
भावनांना मरण येतं..!!
तुझ्या आठवांचा हिंदोळा
हृदयाला पेलवत नाही..!
मग तुझ्या गैरहजेरीत
आसवांनाही करमत नाही..!!
