STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

राख..

राख..

1 min
3

मी तुला तेव्हाही कळलो नाही
आणि आजही कळणार नाही..!
तुटलोय तुझ्या प्रेमात असा की
पुन्हा कधीच जुळणार नाही..!!

तुटलो एवढा की लाख तुकडे होतील
जळून जाईल अन् सारं खाक होईल..!
नको देऊ सखे एवढ्या वेदना मला
एक दिवस या वेदनेतच हरवून जाईल..!!

किती रडू, किती तळमळू अन तळफडू 
माझे खरे प्रेम तुला समजणार नाही..!
जळून राख झालेला चंदन आहे मी
जो आता कधीच दरवळणार नाही..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy