सांगा स्वामी...
सांगा स्वामी...
सांगा स्वामी.. माझे नेमकं चुकलं कुठे?
माझ्या या भावनांचं कोडं सुटलं कुठे?
मेलेल्या हृदयात प्रेमाचा दिवा लावला
तरी हा गडद अंधार नशिबी का आला?
जिच्यासाठी भावनांच्या रक्ताचे पाणी गाळले..
तिच्याच नजरेत कायम अशुद्ध, अपवित्र का ठरलो?
ज्या डोळयांत तिच्यासोबत जगण्याची स्वप्ने सजवली..
त्या डोळयांत सदैव अश्रूनीच गर्दी का केली?
नातं जपण्यासाठी तहान भूक स्वतः ला विसरलो..
तरी तिच्या नजरेत कायमच वाईट, चुकीचा का ठरलो?
सांगा स्वामी.. तुमच्याशी कायम बोललो, सर्व सांगितले..
यांत मी कमी पडलो की माझे प्रेम कमी पडले?
