तुझ्या प्रेमाने..
तुझ्या प्रेमाने..
तुझ्या प्रेमाने मला वेडं करून टाकलं..
हसता हसता डोळयांत पाणी आणून टाकलं.
मी काय होतो मला कुठे माहित होतं..
तुझ्या एका शब्दाने मला बदलून टाकलं..
" वेडा आहेस तू " म्हणतेस तू कधी कधी..
त्या तुझ्या लाडीक बोलाने मला जखमी करून टाकलं..
तू बोलत असली की हे जग खूप सुंदर वाटतं..
वारंवार अबोला दुरावा वाढवून परकं करून टाकलं..
तुझ्यावर खूप रागावतो पण रुसता आलं नाही..
कितीही दूर गेलीस तरी मन तुझंच नाव घेतलं..
नेहमीच तुझी आठवण येते आणि नकळत
या डोळ्यांनी जपून ठेवलेले अश्रू वाहत राहिलं..
तू मिळाली नाहीस याचं दुःख नाही मला
तुझ्यावर प्रेम केलं हेच मनाने पुरेसं मानलं..
