STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

प्रेमभंग...

प्रेमभंग...

1 min
4

का सुचतात या कविता
तुझ्या प्रेमआगीत जळतांना..!
तुझ्या आठवणी लिहाव्या 
वाटतात तू वाचणार नसतांना..!!

मी पूर्णतः ओलाचिंब होतो
तुझ्या आठवणींचे दव पितांना..!
मी मलाच सापडत नाही
तुझ्यात मला शोधतांना..!!

तुझीच स्वप्ने रंगवली
माझी कदर नसतांना..!
तुझीच वाट पाहिली, तू
येणार नाहीस माहीत असताना..!!

थकलोय मी आता तुला
प्रेम परिभाषा सांगतांना..!
काहीच कस वाटत नाही
असं परक्यासारखं वागतांना..!!

प्रेमभंगाचे अनेक प्रश्न पडतात
मनात तुझा विचार करतांना..!
माझेच काही चुकले का
तुला माझे प्रेम समजावतांना..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy