आपले..
आपले..
मुखवट्यांना आरसेही फसवताना पाहिले,
चेहऱ्यांआडचे चेहरे हसताना पाहिले...
काल ज्यांनी सोबतीचे वचन दिले होते,
वेळ येता त्यांनाच दूर जाताना पाहिले...
जखम केली आपल्यांनी प्रेमाच्या नावाखाली,
दोष मात्र नशिबावर ठेवताना पाहिले...
फुलांसारखी मने जपली ज्यांच्यासाठी,
त्याच हातांनी काटे पेरताना पाहिले...
सत्य बोलणाऱ्यांना शिक्षा मिळताना,
खोट्यांना सिंहासन मिळताना पाहिले...
किती विश्वास ठेवावा माणसांवर आता,
आपलेच आपल्याला लुटताना पाहिले...
