अधरपाकळी...
अधरपाकळी...
तुला नित्य बघुन सखे
कंपित देह होतो खाली वर..!
तत्क्षणी मनी विचार येतो
टेकवावे ओठ तुझ्या ओठांवर..
वेडा झालोय सखी तुजसाठी
पण लक्ष नाही तुझे माझ्यावर..!
तुझ्या सौंदर्याने आरसाही खुळा
कधी मेहेरबानी करशील माझ्यावर..!!
अधरपाकळी दातात दाबून
हलकेच मादक तू बघू नकोस..!
जीवघेणी बघुन तुझी ती अदा
असा देह तू माझा चेतवू नकोस..!!
मादक तुझ्या अदा पाहून
सुटते माझ्या नजरेची लगाम..!
ओढीने तुझ्या अधरांच्या
होतो मी क्षणात तुझा गुलाम..!!
ओठांवर आसुरलेली लाली
गालांवर पापी ओली ओली..!
उष्ण श्र्वासांच्या गळ्यात माळा
अन् मिठीत काया शृंगारलेली..!!

