STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

स्वप्न किनारा..

स्वप्न किनारा..

1 min
6

मनास मोहली तीच तू मोहिनी
मनास भावली तीच तू कामिनी..!
चंद्र पौर्णिमेचा शोधू तरी कशाला 
असंख्य चांदण्यातील तीच तू चांदणी..!!

तुझ निरागस हास्य म्हणजे 
जणू नभातील टिपूर चांदणे..! 
नभातल्या सुंदर चंद्राच्या 
गालावर खळी ती गोंदणे..!!

संस्कारांचा मनभावन चंद्र तू 
अन् पौर्णिमेचा तारा आहे..!
साडीवर दिसणारं तुझ सौंदर्य
आपला स्वप्न किनारा आहे..!!

अलौकिक अनुपम या सौंदर्याची
तूच सुरुवात अन् तूच अंत..!
सगळेच दिवाने तुझ्या रूपाचे
त्यात रांगेत उभा खुद्द भगवंत..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics