नतमस्तक...
नतमस्तक...
किती सोसतो, किती तुटलो
यांत स्वप्ने माझी हरवून गेली..
सोसता- सोसता, तुटता- तुटता
किती वादळे येऊन सरून गेली..
नको आता आधाराला खांदा कुणाचा
नको आता आपुलकीची सावली..
कृपा करून एक क्षण असा येऊ द्या
देहातील हा श्वास थांबवा माऊली..
जगता जगता प्रत्येक क्षणाला मेलो
त्यातले काहीच परत नको आता मला..
नियतीचा क्रूर फेरा असा यावा की
त्यात विरतांना अभिमान वाटावा स्वतः ला..
स्वामी एकदा तरी नशीब माझ्या
बाजूने खंबीरपणे उभे राहू द्या..
माझ्या मृत्यूपुढे माझे जीवघेणे दुःख
गुडघे टेकून नतमस्तक होऊ द्या..
