STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

कोजागिरी तुझी माझी..

कोजागिरी तुझी माझी..

1 min
3

तू सोबत असतीस तर 
चांदण्याना मोजत बसलो असतो..
कोजागिरीच्या या रात्री तुझ्या 
देखण्या डोळयांत हरवून गेलो असतो..

तुला माझ्या जवळ पाहून त्या 
चंद्रालाही हेवा वाटला असता..
तुझ्या रसाळ, मधाळ ओठांवरील 
हसू पाहून तोही ढगाआड लपला असता..

पण आज चंद्र आहे, चांदण्या आहेत 
कोजागिरीची रात्रंही सजणार आहे..
फक्त तूच नाहीस आताही सोबतीला 
म्हणून ही पौर्णिमाही अधुरी आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics