STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

प्रेतयात्रा..

प्रेतयात्रा..

1 min
1

जिवंत प्रेत बनून जगत राहीलो 
त्यावेळी कुणी साथ दिली नाही..
मनात दुःख असून ओठांवर हसू ठेवले 
डोळ्यातली वेदना मात्र कुणाला दिसली नाही..

तिळतीळ तुटत राहिले मन माझे 
हात धरायला कुणी आले नाही..
आसवांनी भिजले कितीतरी क्षण पण 
' काय झालं ' म्हणून कुणी विचारले नाही..

आज माझ्या जाण्याने खोटे रडत आहेत 
काल माझ्या जगण्याची किंमत नव्हती..
मेल्यावर प्रेतयात्रेला गर्दी जमली पण 
जगतांना माझी वेदना कुणाला कळली नाही 

मेल्यावर माझी प्रेतयात्रा निघाली 
पण मनात एक प्रश्न राहिला..
जिवंतपणी जो आपला झाला नाही 
तो मी मेल्यानंतर का बरं रडला..?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy