STORYMIRROR

Sunita Ghule

Tragedy

3  

Sunita Ghule

Tragedy

जीर्ण अवशेष

जीर्ण अवशेष

1 min
271

जीर्ण अवशेष


भंगलेले अवशेष

खुणा जुन्या वैभवाच्या

सेवाश्रम, रूग्णालय

जीर्ण उध्वस्त अस्तित्वाच्या।


आर्त वेदनेच्या दुःखा

कुणी घातली फुंकर

दयार्द्र नजरेने त्या

जखमांना हळूवार।


ओस पडला का स्नेह

काय असेन आपत्ती

ममत्वाला हृदयीच्या

कुणी दिली मूठमाती।


आशा मनी ठेवायची

किलबिल यावी कानी

नव अर्भकाचा टाहो

सुख ओसंडे सदनी।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy