आसवं
आसवं
1 min
408
डोळ्यात आसवांच्या
बरसती रिमझिम धारा
आठवांनी सख्याच्या
उठे मनी वादळवारा।
का एकटी इथे मी
झुरते तुझ्याचसाठी
नाही सोडवत ऐशा
जुळल्या रेशीमगाठी।
तू दिसताच समोरी
रोमांच तनूवर हलका
हूरहुर अनामिक दाटे
तू जवळ असुनी परका।
क्षण जगावे असे की
सुखाने भरावी ओंजळ
आसवांच्या थेंबात फिके
पापणीतले रे काजळ।
काय दुःख करावे ज्याचे
सुख कधीच नव्हते माझे
श्वासात भरून घ्यावे
जीवनगीत माझे-तुझे।