STORYMIRROR

गीता केदारे

Tragedy

3  

गीता केदारे

Tragedy

... भग्न रूग्णालय....

... भग्न रूग्णालय....

1 min
529

... भग्न रूग्णालय... 


भग्न या रूग्णालयात

कितीतरी रूग्ण भरती होते

सर्व रूग्ण आजारापायी

वेदनेने बेजार होते...


झोपून झोपून खाटेवर

पाठीला कळ लागत असे

नाका तोंडातील नळी

घशात टोचत असे...


वेदना प्रत्येकाची वेगळी

आजार सर्वांचे आगळे

औषधांचा करूनी मारा

डाॅक्टर करी उपचार निरनिराळे...


झाले कोणी वेदनामुक्त

कोणी गेले यमसदनी

डाॅक्टरांच्या उपचारांबरोबर

देवाची ही करी आळवणी...


आज या रूग्णालयाची

अवस्था नाही बरी

रूग्णांना बरं करता करता

रूग्णालयच झाले आजारी...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy