STORYMIRROR

गीता केदारे

Inspirational

3  

गीता केदारे

Inspirational

निसर्ग किमया...

निसर्ग किमया...

1 min
245

पाऊस गातो गीत

गीत होई तराने

निसर्गाची किमया

किमया पावसाने...


जीवसृष्टी बहरे

बहरे लतावेली

पावसाच्या जादूने

जादूने चिंब मुली ....


बेडकांची डराव

डराव चालू झाली

 छत्र्यांची लगबग 

लगबग रे झाली...


इवल्याशा तळ्यात

तळ्यात सोडू नाव

बालपण सुखाचे

सुखाचे असे गाव...


भिजऱ्या या स्पर्शात

स्पर्शात मन चिंब

पावसाच्या सरीत

सरीत घन थेंब...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational