पाऊस आला...
पाऊस आला...
रानीवनी मोहरला
वर्षा ऋतू बहरला
थेंब थेंब बरसला
मृद्गंध दरवळला ||1||
पानेफुले बहरली
हिरवीगार जाहली
धरित्री ही आनंदली
झाडे डोलू लागली ||2||
मन झाले ओलेचिंब
तन बेधुंद जाहले
पावसाच्या धारांत
सारे गारा वेचू लागले ||3||
होता पावसाची कृपा
बळीराजा सुखावतो
धरेवर करुनी वृष्टी
अवघी सृष्टी नटवतो||4||
सारे गाती हिरवी गाणी
आला पाऊस, पाऊस आला
मायेच्या सुखद स्पर्शाने
धरणीला तृप्त करुन गेला ||5||