STORYMIRROR

गीता केदारे

Others

3  

गीता केदारे

Others

मन...

मन...

1 min
181

मन हे नाजुक नाजुक

जणू गुलाबाच्या पाकळीवानी

येता दूःखाचे पडसाद

जाई क्षणात हे कोमेजूनी!


मन रे कठिण कठिण

होई कधी दगडासम

करा कितीही घाव त्यावर

नाही पाझरत ते कणभर!


मन हे हळवे हळवे

जसे अळूहूनि थेंब ओरघळे

दाटता आठवणींचे क्षण

झरा अश्रुंचा नयनी पाघळे!


मन रे जहरी जहरी

सर्पाच्या विखापरि

बोल लागती ज्याचे जिव्हारी

त्यावरी डूख हा धरि!


मन हे अथांग अथांग

यांत भावनांची पांगापांग

मिळता याला योग्य दिशा

घेई भरारी हे उत्तुंग!


मन हे तुझे न् माझे

मन हे आपल्या सर्वांचे

घडण त्याची रे एकच

पण अंतरंगी रे याच्या भावना अनेक!!!!



Rate this content
Log in