STORYMIRROR

गीता केदारे

Romance Others

4  

गीता केदारे

Romance Others

असंच वाटतं कधीतरी..

असंच वाटतं कधीतरी..

1 min
352

असंच वाटतं कधीतरी... 


असंच वाटतं कधीतरी 

तूच फक्त तूच जवळ असावा…. 


मिटल्या या पापण्यांत 

स्वप्नात फक्त तूच दिसावा….. 


अंतरंगाच्या कवडशात 

तूच रंगलेला दिसावा…. 


थरथरत्या अधरावरील 

शब्दांत ही तूच असावा…. 


श्वासाच्या रोखामध्ये 

दरवळ ही तूच असावा…. 


क्षितिजाच्या मिलनामध्ये 

आलिंगन ही तूच असावा…. 


जीवन हिंदोळ्यावर 

शेवटच्या क्षणी 

अत्तराच्या कुपीत ही तूच असावा…… 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance