STORYMIRROR

गीता केदारे

Abstract

3  

गीता केदारे

Abstract

.. स्वामी टेकितो माथा..

.. स्वामी टेकितो माथा..

1 min
186

नतमस्तक तुमच्या चरणी

स्वामी टेकितो माथा

विघ्न करा दूर पामरांचे

सहनशक्ती संपली आता...

स्वामी टेकितो माथा...


दीन दुबळ्यांची आरोळी 

स्वामी तुम्ही हो ऐकता

अश्रू पुसूनी नयनांतील

हसू वदनी हो आणता....

स्वामी टेकितो माथा...


नामस्मरण तुमचे ओठी

 जपमाळ तव जपता

 आधार तुमचाच आम्हास

हो कृपावंत जगद्गुरू दाता....

स्वामी टेकितो माथा....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract