STORYMIRROR

गीता केदारे

Classics

2  

गीता केदारे

Classics

चल सखये....

चल सखये....

1 min
182


चल सखये.. पावसात भिजायला 

पाऊस आसुसला आपल्या मिलनाला... 


जशी मिळे नदी सागराला 

तसाच मी ही आतुर आलिंगनाला.... 


भेटीत तुझ्या न्हाऊ घालीन मनाला 

होऊ दे चिंब अंतरंग नको रोखू वर्षावाला... 


रोखूनी तुज पाहता सुर मिळे सुराला 

इंद्रधनुची लाली आली पहा तुझ्या गालाला 


ऐकता सुखदुःखे एकमेकांची येई पूर नयनांला 

भिजवू पावसाला आपण, पाऊस भिजवेल आपल्याला... 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics