STORYMIRROR

गीता केदारे

Romance

3  

गीता केदारे

Romance

प्रीतफुला..

प्रीतफुला..

1 min
388

आहे तुझ्यावरच प्रेम

हेच सांगायचे आहे तूला... 

चेहऱ्यावरील भाव अलवार

टिपायचे आहेत मला.... 


गालावरील गोड खळीला 

निरखून पाहायचे आहे मला 

केसामधील बटांमधूनी या

बोटं फिरवायचीत मला.... 


डोळ्यातील बाहुल्यांमध्ये 

बघायचे आहे प्रीतफुला 

गंधाळलेल्या श्वासातही 

विरुन जायचे आहे मला.... 


आहे जरी दुर दूर मी 

तुझ्यातच सजायचयं मला 

रोमारोमात तुझ्याच सहजसे

एकरूप व्हायचे आहे मला.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance