पळणे
पळणे
मी पळत रहातो पुढ्यात टांगलेल्या गाजरासाठी...
कधी ते असते सत्ता मानमरातब अन् पैशासाठी ,
तर कधी नौकरी ,धंदा स्थैर्यासाठी,
तर कधी रोजचेच जगणे जगण्यासाठी...
पण त्यामागे पळणे आयुष्यभरासाठी ...
माझ्याच धुंदीत असतो मी
नसते भान कशाचे
नशा फक्त गाजर मिळवण्याची...
नशेपोटी पळण्याचा रस्ता राजमार्ग की आडवळण
हेही लक्षात येत नाही ,
गाजरापर्यंतचे अंतर कधी कमीच होत नाही...
माझं पळणं म्हणजे एक खोल गर्ताच असते
एका सरळ रेषेत पळता पळता स्वतःभोवतीच फिरत रहातो मी...
अपयशाचे अनेक खड्डे टाळून फक्त गाजरासाठी पळत रहातो मी...
