STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

4  

Sonali Butley-bansal

Others

जलधारा

जलधारा

1 min
366

पावसाच्या सगळ्याच आठवणी सांगायच्या नसतात

काही झेलायच्या असतात ,

तर काही पेलायला असतात,

तर काही चहाच्या वाफेसोबत हवेतच विरवायच्या असतात ...


पाउल वाटेवर धुके पसरलेले असते,

हिरवाई थेंबांसंगे बोलत असते,

पावसाच्या सरी आभाळीचे गुपित सांगता सांगता मातीत मिसळतात,

सरसर येताना त्याला एकट्याच असतात ,

धरतीवर मात्र मिसळून जातात....


तेव्हा मी ही पावसाळून जाते खोलवर ,

आसवांच्या असंख्य जलधारा ओघळून जातात,

पावसासोबत कधी काळी पाहिलेली स्वप्नं

जशीच्या तशी फेरीत धरू लागतात...

पावसाइतका पारदर्शकपणा त्यांच्यातही होता

तरीही ते स्वप्न म्हणूनच का राहीले?

याचं ऊत्तर मी शोधत रहाते ...

याचं ऊत्तर मी शोधत रहाते ...






Rate this content
Log in