प्रतीक्षा...
प्रतीक्षा...
1 min
153
पाण्यावर तरंगणाऱ्या पाचोळ्यागत झालय आयुष्य ....
प्रवाहासोबत पुढे पुढे सरकणारं.....
तर कधी काडी कचर्यात अडकून तिथेच थांबणारं ....
वाऱ्याच्या झुळुकेने देखील दिशा बदलणारं.....
भोवर्यात अडकून गोल गोल फीरणारं..
अन कधीखोलवर आत जात दिसेनासा होणारं....
तरीही चिवट मन,
पाण्यावर स्वार होऊन स्वतः ठरवलेल्या दिशेने जाणाऱ्या जहाजासारखं
आयुष्य बळकट कधी होईल या प्रतीक्षेत....
