उधळण
उधळण


पुस्तकांची पाने चाळताचाळता
मोरपिसं सापडत जातात
अलगदपणे मग पिसारा फुलत जातो
आणि मी हरवत जाते त्या मोरपिशी रंगात ...
ते रंग मग उधळण करत राहतात
पावसाळी तुषारांची,
ऊन पावसाच्या लपंडावाची,
पंचमीच्या झोक्याची,
गणपतीत उधळलेल्या गुलालाची,
भाद्रपदातल्या पीतरांच्या हळव्या आठवणींची,
नवरात्रीच्या हळदीकुंकवाची, जागराची अन्
सीमोल्लंघनाची...
फटाक्यांच्या आतषबाजीची, नवीन कपड्यांची
खंडोबाच्या हळदीची,
चैत्राच्या कोवळ्या पालवीची,
पाडव्याच्या पंचांगाची,
गावजत्रेच्या या पताक्यांची,
अशाच अनेक सोनसळी क्षणांची,
फुलापानांच्या हर्बेरिअममधल्या
खुणांची अन् उमटलेल्या ठशांची