वात
वात

1 min

312
संध्याकाळी देवापुढे तेवणाऱ्या दिव्याच्या मंद वातेवर नजर स्थिरावते...
धूपबत्तीच्या वलयात स्तोत्र म्हणत नकळत हात जोडले जातात...
त्या वातीची शाश्वतता आणी निच्शलता नसानसात उतरते अन्
उजाळत जातो मनाचा कोपरा अन् कोपरा अन् तेजोमय वाट..
तरीही भरकटलेला एखादा क्षण धुंडाळत रहतो
नजर चुकून आलेलं कधीकाळचं अंधारलेलं वळण...