STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

4  

Sonali Butley-bansal

Others

खिडकीचं अंतर...

खिडकीचं अंतर...

1 min
378

मी एकटक बघत असते तुला खिडकीतून

जेव्हा तू येत असतो रिमझीमत ,

कोसळत असतोस धुवांधार,

कधी रिपरिप असतोस,

तर कधी फक्त दिसतात अस्तित्व खुणा

छतावरून पडणाऱ्या थेंबात,

तर कधी वायरवरून ओघळत

टीप टीप पडणाऱ्या मोत्याच्या दाण्यागत थेंबातून,

तर कधी पक्षांच्या फडफडणार्या पंखातील तुषारांतून,

तर कधी झाडांच्या ओलेतेपणातून ,

खड्ड्यांना चुकवत चालणाऱ्या माणसांतून ,

 रेनकोटमधून तुला हातावर झेलणाऱ्या मुलातून, एकाच छत्रीतून जाणाऱ्या मैत्रीतून,


तुझ्यापर्यंत हल्ली पावलं वळतच नाहीत माझी,

तुझ्या तुषारांत चिंब भीजावं असं उरलं नाही मुळी

तुझ्या माझ्यात आता आहे,

 एका खिडकीची अंतर ...

एका खिडकीचं अंतर ...


Rate this content
Log in