STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

4  

Sonali Butley-bansal

Others

शब्द असतात. ....

शब्द असतात. ....

1 min
413

अक्षरं असतात एकाकी स्वच्छंदि मुक्तहस्त 

अडकवलं जात त्यांना काना मात्रा आणि वेलांट्यांच्या बंधनात मग निर्माण होतात शब्द

अगणित अर्थासह स्वतंत्र अस्तित्वासह मुक्तछंद .....


शब्द असतात, फसवे, शांत, निश्चल, सुस्वभावी, कणखर,अन् निग्रही

कधी ते असतात झुरणारे, थरारणारे, फुलणारे, तर कधी काळजाचा ठाव घेणारे ,

काही तरी मागणारे, आतल्या आत विरघळणारे, कधी मितभाषी पाल्हाळ लावणारे,

मायेचे पांघरूण घालणारे अन् सापागत डसणारे ....


कधी असतात काळीज आरपार चीरणारे, जखमेची खूणही मागे न ठेवता

आतल्या आत रक्तबंबाळ करणारे माणूसपण गोठवणारे....


शब्द कधी बनतात कधी शाप आणि उःशापाचे बळी तर कधी तेच बनतात

ओवी, अंगाई,आणि मंत्र नवसंजीवनी देणारे चैतन्याची लहर पसरवणारे....


Rate this content
Log in